कसाल हायस्कुलमध्ये आमदार निलेश राणे यांच्या हस्ते १०० विद्यार्थ्यांना सायकल वाटप

जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांचे सौजन्य
कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल, संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सौजन्याने प्रशालेतील १०० पेक्षा जास्त होतकरू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.
ही सायकल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देईल आणि त्यांच्या प्रगतीस हातभार लावेल, असा विश्वास यावेळी आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळ तालुका सभापती मिलिंद नाईक, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, महायुतीचे कार्यकर्ते, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य, स्थानिक सरपंच, विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





