खारेपाटण रामेश्वरनगर जि.प. शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

खडीकरण व डांबरीकरण कामासाठी १० लाख रुपये मंजूर
खारेपाटण येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ते खारेपाटण रामेश्वर नगर जि.प.शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ नुकताच शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर,पं.स.सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे,खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव,माजी सरपंच श्री रामकांत राऊत,ग्रा.पं.सदस्य श्री सुधाकर ढेकणे,जयदीप देसाई, किरण कर्ले,सौ मनाली होणाळे, शितीजा धुमाळे,श्री प्रणय गुरसाळे, सागर पोमेडकर,सुहास राऊत, मंगेश ब्रम्हदंडे,अनिकेत गुरव, खारेपाटण ग्रा.पं.ग्रामविकास अधिकारी श्री विशाल वरवडेकर, रामेश्वर नगर खारेपाटण चे रहिवासी श्री फडके,आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण रामेश्वर नगर जि.प.शाळेकडे जाणारा तसेच नागरी वस्ती कडे जाणारा रस्ता गेली बरीच वर्षे झाला नव्हता.परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने खारेपाटण ग्रामपंचायतीच्या पाठ पुराव्यामुळे सदर रस्त्याचे काम जिल्हा वार्षिक योजना नागरी सुविधा यामधून घेण्यात आला असून या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी सुमारे १० लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असून स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे व स्थानिक ग्राम पंचायतीचे आभार व्यक्त करण्यात येत आहे





