माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील भव्यदिव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा

आकर्षक बक्षीसे व भव्य आयोजनाने स्पर्धा ठरत आहे लक्षवेधी

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री तथा खासदार मा नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त भाजपा कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या ‍वतीने सिंधुनायक चषक 2026 या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या ‍ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत नाधवडे ता. वैभववाडी येथील श्री महादेव मैदान येथे केले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असणा-या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देशभरातील विविध संघ सहभागी होणार आहेत. या संघांमध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असणार आहे. सिंधुदुर्ग – रत्नागिरी – कोल्हापूर जिल्हया बरोबर गोवा येथील क्रिकेट खेळाडूंना व क्रिडा प्रेमींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ जवळून पहाता यावा या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असून प्रकाशझोतात होणा-या या स्पर्धेला अनेक मंत्री, केंद्रिय मंत्री, अनेक प्रतिभावान खेळाडूंसह उद्योजक, कलाकार व अनेक मान्यवर भेट देणार आहेत.
या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा भव्यदिव्य असणार असून स्पर्धेसाठी डी जे साऊंड सिस्टीम, प्रेक्षकांसाठी प्रशस्त आसन व्यवस्था केली जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता सुरु होणा-या या क्रिकेट स्पर्धेसाठी नामाकिंत समालोचक उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकचे ‍ पारितोषीक 5 लाख 75 हजार 575 रुपये तर दवितीय क्रमांकासाठी 2 लाख 75 हजार 575 रुपये पारितोषिक ठेवणेत आले आहे. त्याखेरीज मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक मोटरसायकल व मॅन ऑफ द मॅच साठी विविध आकर्षक बक्षीसे व खेळाडूंसाठी विविध रोख बक्षीसे ठेवणेत आली आहेत.
या स्पर्धेमध्ये सन्मा नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील 75 निमंत्रित दिव्यांगाना भेटवस्तू देण्यात येणार असून या 75 दिव्यांगामधील 3 दिव्यांगाना लकी ड्रॉ द्वारे दिव्यांगांसाठीची मोटरसायकल भेट दिली जाणार आहे.
उपस्थित प्रेक्षकांसाठी विविध बक्षीसे देण्यात येणार असून महिला व पुरुषांसाठी दररोज लकी ड्रॉ काढणेत येऊन त्या योगे विविध ‍ बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच शेवटच्या दिवशी उपस्थित महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र लकी ड्रॉ काढून प्रथम क्रमांकांना प्रत्येकी 1 इलेक्ट्रीक स्कुटर व विविध आकर्षक बक्षिेस देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या राष्ट्रीय क्रिडास्पर्धेला दिनांक 8 व 9 रोजी अनेक सेलिब्रीटी, नामांकित खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री मा नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेसाठी लागणा-या व्यवस्थापनाची तयारी मोठ्या स्वरुपात सुरु आहे. भव्यदिव्य होणा-या या स्पर्धेचा सिंधुदुर्ग-रत्नागिरी-कोल्हापूर जिल्हयाबरोबर गोवा राज्यातील क्रीडा प्रेमींनी लाभा घ्यावा असे आयोजकांच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक श्री. दिलीप रावराणे, माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री. मनोज रावराणे, माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर, श्री. दिलीप तळेकर मंडल अध्यक्ष कणकवली – ग्रामीण, श्री. बंड्या नारकर मंडल अध्यक्ष पडेल, श्री. मिलींद मेस्त्री मंडल अध्यक्ष कणकवली शहर, श्री. राजा भुजबळ मंडल अध्यक्ष देवगड, श्री. सुधीर नकाशे मंडल अध्यक्ष वैभववाडी, कणकवली पंचायत समिती सभापती सौ. हर्षदा वाळके, देवगड पंचायत समिती सभापती श्री. गणेश राणे, वैभववाडी पंचायत समिती सभापती सिध्देश रावराणे यांनी आवाहन केले आहे.

error: Content is protected !!