ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104 कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडलं

कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम
आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104 कासवांच्या पिल्लांना कासव मित्र सूर्यकांत धुरी, आचरा वनरक्षक प्राजक्ता पाटील, नितेश गितये यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. यावेळी आचरा पोलीस ठाण्याच्या श्रीमती गौरी जाधव,पिरावाडी पोलीस पाटील सौ तन्वी जोशी, प्राथमिक शाळा गाऊडवाडीचे मुख्याध्यापक राजेश भिरवंडेकर,सौ गवळी मॅडम, अंगणवाडी सेविका कविता कुबल,वर्षा गावकर, विद्यार्थीआदी उपस्थित होते.
कासव संवर्धनाची अनोखी परंपरा कासवमित्र सुर्यकांत धुरी यांनी कायम सुरु ठेवली आहे. या बाबत बोलताना धुरी सांगतात की चालू हंगामात आतापर्यंत अनेककासव पिल्ले समुद्रात सोडली असून आचरा बीचला विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी कासव जास्त पसंती देत आहेत आचरा समुद्रकिनारा त्यांना सुरक्षित वाटत आहे ही बाब अत्यंत आनंदाची असूनआपण त्यांना सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे धुरी यानी सांगितले.





