सिंधुदुर्गचा डंका भारत श्रीमध्ये!

गणेश सातार्डेकर टॉप 15 मध्ये!
भारत श्री 2026 मध्ये सिंधुदुर्गची मोहर!
एकमेव सिंधुदुर्गचा स्पर्धक!
सिंधुदुर्गच्या भूमीतून पुन्हा एकदा अभिमानाची बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्गचा सुपुत्र गणेश सातार्डेकर यांनी “भारत श्री 2026” या प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धेत दमदार कामगिरी करत टॉप 15 मध्ये स्थान मिळवले आहे.
पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत एकमेव स्पर्धक म्हणून त्यांनी निवड मिळवली होती, आणि आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
६५ किलो गटात खेळताना त्यांनी दाखवलेली मेहनत, आत्मविश्वास आणि स्टेजवरील उपस्थिती खरंच वाखाणण्यासारखी आहे. विशेष म्हणजे, गणेश सातार्डेकर हे वायरी भूतनाथ येथील ‘स्वामी समर्थ होमस्टे व रेस्टॉरंट’चे मालक असून, व्यवसाय सांभाळत त्यांनी शरीरसौष्ठवात मिळवलेले हे यश खरोखर प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या यशामुळे “भारत श्री” च्या मंचावर सिंधुदुर्गची मोहर उमटली आहे.
गणेश सातार्डेकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
अभिनंदन गणेश सातार्डेकर!






