नाशिक येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

कबड्डी पंच अमित गंगावणे व प्रथमेश नाईक यांची या स्पर्धेकरिता सामना अधिकारी म्हणून निवड

नाशिक येथे दि. 2 एप्रिल 2026 ते 6 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या 73 व्या वरिष्ठ पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन मान्यवरांची सामनाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व सुप्रसिद्ध पंच म्हणून ख्याती असलेले अमित गंगावणे आणि प्रथमेश नाईक यांची सामनाधिकारी म्हणून निवड झाली आहे. ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रातील योगदानाची दखल घेतली गेली आहे.
या यशाबद्दल दोघांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!