सुशांत दळवी याला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून धमकी होती!

माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा गौफ्यस्फोट

शिकारीच्या नावाखाली प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न

पोलिसांच्या भूमिकेबाबत दोन्ही माजी आमदारांकडून संशय व्यक्त

सुशांत दळवी याच्या हत्येप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांची भूमिका संशयास्पद असून सुशांत दळवी यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्यांचा सर्वांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सुशांत दळवी यांना एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून काही दिवसांपूर्वी धमकी आली होती. असा गौफ्यस्फोट माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. तर सिंधुदुर्ग पोलीस दबावाखाली काम करत असून सिंधुदुर्ग पोलिसांच्या या भूमिकेबाबत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. आता पोलिसांनी जो आरोपी या प्रकरणात अटकेत घेतला आहे हा आरोपी प्रमुख आरोपी नसावा किंवा यामागील खरा सूत्रधार वेगळाच असावा अशी देखील जनतेमध्ये चर्चा आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल तपास करण्याची गरज आहे. तसेच याबाबत एका सरकारी वकिलाने देखील आरोपी बाबतची माहिती माध्यमांना दिल्याने एकूणच या प्रकरणातील संशय अजून वाढत असल्याचे श्री नाईक व उपरकर यांनी सांगितले. कणकवलीत विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुशांत दळवी हा शिवसैनिक होता. त्यामुळे त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा देखील इशारा त्यांनी दिला.

error: Content is protected !!