मुकादमानेच केला सुशांत दळवी यांचा खून

गावठी कट्ट्या सदृश्य हत्यार जप्त

तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

कणकवलीतील प्रतिथयश बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी गतिमान हालचाली करत सुशांत यांचा मुकादम अमर सत्यवान कदम (19 ओरोस – डोंगरेवाडी) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात या खुनाचा विविध अँगलने तपास सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुशांत व अमर हे दोघे गुरुवारी रात्री शिकारीसाठी गेले होते. त्याचवेळी काही कारणास्तव अमर यांनी सुशांत यांच्यावर गोळी झाडली, असे पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. मात्र अमर याने सुशांत यांचा खून का केला हे कारण अद्यापही समोर येऊ शकलेले नाही. दरम्यान गावठी कट्ट्या सदृश्य हत्यार पोलिसांनी हस्तगत केली असून या प्रकरणात मुकादम याच्यासह त्याचे अन्य दोन साथीदार पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

error: Content is protected !!