कविलकाटे येथील ग्रीन-झोन उठविण्याबाबत बाबतआमदार निलेश राणे यांचे न.प. सीओ यांना आदेश

समील जळवी यांनी आमदार निलेश राणे यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष

नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदरचा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते समिल प्रभाकर जळवी यांनी आज कुडाळ -मालवणचे आमदार निलेश राणे यांना निवेदन देत चर्चा केली आणि सदरचा झोन लवकर ऊठवावा अशी मागणी केली. या निवेदनाची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायत कार्यालयातील भेटी दरम्यान या विषयी कुडाळ न. प. चे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी चर्चा करत त्यांना सदरचा झोन उठवण्यासाठी कार्यवाही करा असे आदेश दिले.
गेली कित्तेक वर्षे कुडाळ नगरपंच्यायत हद्दीतील कविलकाटे १. नंबर वॉर्ड मधील शेतकरी आणि नागरीकांची प्रमुख्याने कविलकाटे येथील जमिनीवरील ग्रीन झोन ऊठवावा अशी आग्रहाची मागणी आहे. परंतु हा झोन उठत नसल्याने आज समिल जळवी यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. कुडाळ शहरातील या महसूली गावात लोकांच्या जवळपास साठ टक्के जमिनीवर ग्रीन झोन लागलेला आहे आणि सध्याच्या परिस्थितीत ही गंभीर बाबा आहे.
कविलकाटे येथे ग्रीन झोन लागल्यामुळे गावातील लोकांना घर बांधणी करणे, घर दुरुस्ती करणे, घरापर्यंत वीज घेणे तसेच घरासाठी बँकेकडून लोन घेणे, नवीन घरासाठी घर नंबर घेणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे यातील कोणत्याच प्रक्रियेत नागरिकांना सहभागी होता येत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी, तसेच नागरिक या ग्रीन झोनला त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
काही महिन्यापूर्वी कुडाळ नगरपंच्यायतच्या मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून काही पुढील कार्यवाही किंवा कोणतीही हालचाल झाल्याची दिसत नसल्याने कुडाळ मधील एका कार्यक्रमा दरम्यान समिल जळवी यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन सदरची परिस्थिती सांगितली आणि त्यांच्याकडे लेखी निवेदन देत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांना निदर्शनास आणून दिली. दरम्यान या निवेदनाची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायत कार्यालयातील भेटी दरम्यान या विषयी कुडाळ न. प. चे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी चर्चा करत त्यांना सदरचा झोन उठवण्यासाठी कार्यवाही करा असे आदेश आमदार निलेश राणे यांनी दिले आहेत.

error: Content is protected !!