मुंबईच्या शिवाजी मंदिर ट्रस्ट कडून शिष्यवृत्ती प्रदान

कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांना आज शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. मुंबई दादर येथील शिवाजी मंदिर ट्रस्ट कडून शिष्यवृत्तीचे धनादेश प्रशालेतील 21 विद्यार्थ्यांना आज सुपूर्द करण्यात आले.
कनेडी प्रशालेच्या ज्ञानदीप सभागृहामध्ये आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवाजी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश उर्फ भाई सावंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत, पत्रकार विनय सावंत, शालेय समितीचे सदस्य तुषार सावंत, बावतीस घोन्सालवीस, संतोष सावंत, प्रशालेची प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुरान आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाजी मंदिर ट्रस्ट वतीने गेल्या पाच वर्षापासून प्रशालेतील होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. संस्थेच्या वतीने आतापर्यंत या शिष्यवृत्तीच्या फायदा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली आहे. माजी आमदार कै. सि. स. सावंत तसेच ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी नेहमीच कनेडी शिक्षण संस्थेला सहकार्य केले आहे. आपल्याच गावातील ही संस्था आणि या दशक्रोतीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या कोणतीही अडचणी येऊ नये आर्थिक अडचण येऊ नये. हा दृष्टिकोन ठेवून प्रतिवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते.छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट चे विद्यमान अध्यक्ष माजी खासदार भिरवंडे गावचे सुपुत्र ब्रिगेडीअर सन्मा सुधीर सावंत ट्रस्ट चे विश्वस्त प्रकाश ( भाई ) सावंत यांना तसेच यासाठी प्रयत्न करणारे राजेंद्र सावंत (डोंगरे ) यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!