उन्हाळी हंगामासाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज
१५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ३१ जादा फेऱ्या
कुडाळ ; उन्हाळी हंगाम सुरू झाला असून पुढील काही दिवसापासून कोकणात चाकरमान्यांची वर्दळही सुरू होणार आहे. शाळांच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात आल्याने या सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांना विविध लांबच्या मार्गांवर प्रवास करण्यासाठी सिंधुदुर्ग एसटी विभागाने १५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ३१ जादा फेऱ्या सोडण्याबाबत नियोजन केले आहे. प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी दिली. या जादा गाड्यांमुळे एसटीच्या जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी विभागीय कार्यालयात अभिजीत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अभिजित पाटील म्हणाले, सिंधुदुर्ग विभागाकडून मालवण-मुंबई, विजयदुर्ग- मुंबई, देवगड-नालासोपारा, देवगड-बोरिवली या चार नियमित गाड्या सुरू आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार आणखीन ३१ गाड्या नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये बोरिवली, आंबेजोगाई, तुळजापूर, पुणे रत्नागिरी आधी भागात जाणाऱ्या गडांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यादा आणि नियमित ३५गाड्यांमधून प्रवाशांना वाहतुकीची सुविधा पुरविण्यात येईल या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे.
यामध्ये सावंतवाडी पुणे-निगडी, सावंतवाडी- बेळगाव, देवगड-बेळगाव, कणकवली -औरंगाबाद, कणकवली-अंबेजोगाई, सावंतवाडी-बोरीवली, सावंतवाडी रत्नागिरी, सावंतवाडी- कोल्हापूर, मालवण-पुणे-निगडी, मालवण -रत्नागिरी, कणकवली-मालवण-रत्नागिरी, बोरीवली, कणकवली-मुंबई, देवगड- बोरीवली, कणकवली-बेळगाव, विजयदुर्ग-इचलकरंजी, वेंगुर्ले-पुणे- निगडी, मालवण-पुणे, कणकवली- रत्नागिरी, कणकवली-पुणे, देवगड- कुर्ला नेहरूनगर, विजयदुर्ग-बोरीवली, विजयदुर्ग-पुणे-चिंचवड, कुडाळ- विजापूर, कुडाळ-बोरीवली, कुडाळ- पुणे, कुडाळ- बोरीवली, वेंगुर्ले- तुळजापूर, वेंगुर्ले-आरोंदा-परेल यांचा समावेश आहे.
प्रतिनिधी, कुडाळ