कुडाळ प्रांताधिकारी म्हणून ऐश्वर्या काळुशे यांची नियुक्ती
जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांची बदली
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात बदल्यांना वेग
महसूल विभागातील मधल्यांना वेग आला असून कणकवली प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांची नियुक्ती देण्यात आल्यानंतर कुडाळ प्रांताधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्हा (को. रे.) साठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या ऐश्वर्या काळुशे यांना बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांची बदली करत त्यांना अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे या रिक्त पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली