कणकवली तालुका बार असोसिएशनला पुस्तकांकरिता आमदार नितेश राणेंकडून ५० हजारांचा निधी

ऍड. राजेश परुळेकर यांनी केला होता पाठपुरावा
कणकवली तालुका बार असोसिएशनकरिता कायदेविषयक पुस्तकांच्या खरेदी साठी ५० हजारचा निधी नितेश राणे यांच्या आमदार स्थानिक विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार श्री. राणे यांच्याकडे विशेष मागणी करणे, तसेच त्यांच्या कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करणे यासाठी बारचे सदस्य ऍड. राजेश परुळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. व सदर निधी कणकवली तालुका बार असोसिएशन कडे प्राप्त करून दिला. याबद्दल कणकवली तालुका बार असोसिएशन ने ॲड.राजेश परुळेकर यांचे विशेष आभार मानले. जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग चे सहा.अधीक्षक श्रीम. शेख यांचेकडून रू.50 हजार चां डीडी स्वीकारन्यात आला. यावेळी ऍड. राजेश परुळेकर, स्वप्नील सावंत, सचिव कणकवली तालुका वकील संघ,विशाल दळवी, राहुल तंबोळकर, अग्निवेश तावडे आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली