डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरवल विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे रक्त तपासणी शिबिर संपन्न

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व संदेश पारकर यांच्या हस्ते रक्त तपासणी शिबिराचा शुभारंभ

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात आज मोफत रक्त तपासणी शिबिरापासून करण्यात आली. हिंद लॅब सिंधुदुर्ग व विजयराव नाईक फार्मसी कॉलेज  यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व  शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते रक्त तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये ३०० विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली. ३० पेक्षा जास्त आजारांचे निदान या रक्त तपासणी द्वारे केले जाणार आहे. 

    याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

         यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,निसार शेख, हिंद लॅब सिंधुदुर्गचे प्रशांत जाधव,वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी,युवक कल्याण संघ सचिव रमन बाणे, खजिनदार मंदार सावंत, कॉलेजचे प्राचार्य डॉ. जगताप,प्रा. बाबर, प्रा. कुलकर्णी आदींसह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!