१५व १६ एप्रिल रोजी कासार्डेत जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचा उपक्रम

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ -सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि वैभववाडी तालुका कबड्डी असोसिएशन च्या सहकार्याने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे दि. 15 व 16 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदार पंच शिबीर हे सिंधुदूर्ग कब्बडी फेडरेशन च्या मान्यतेने घेण्यात येत आहे.
इच्छुकांनी कबड्डी पंच परीक्षेसाठी नाव नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. पंच परीक्षेला सहभागी होत असताना संबंधितांनी सोबत कंपास पेटी व मूळ फॉर्म भरून घेऊन येणे यावे.तसेच पासपोर्ट साईज ४ रंगीत फोटो, वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला अथवा शाळा सोडलेल्या दाखल्याची झेरॉक्स प्रत घेऊन यावी.
या जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा शिबिराला राष्ट्रीय पंच मिनानाथ धानजी (मुंबई), रवी देसाई (रत्नागिरी), सदानंद मांजलकर(मुंबई), दत्ता झिजुर्डे (पुणे), शशिकांत राऊत(मुंबई),व अजित पाटील (कोल्हापूर) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
दि. 15 एप्रिल रोजी दु.२ वा. कबड्डी ‘मार्गदर्शन शिबिराला’ प्रारंभ होणार असून दि.16 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2 लेखी परीक्षा आणि दु.2 नंतर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.
तरी पंच परीक्षा संदर्भातील अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी
शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गाचे अध्यक्ष बयाजी बुराण सर (मोबा-+91 94211 44605),सचिव दिनेश म्हाडगुत सर (मोबा.+91 94043 44460) युवा जिल्हा अध्यक्ष वैभव कोंडसकर (मोबा. +91 94203 53947),तसेच राष्ट्रीय पंच मधुकर पाटील सर(मोबा.9403074521)
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.

अस्मिता गिडाळे / खारेपाटण

error: Content is protected !!