रक्तदान हे समाज परिवर्तन घडविणारे उपजिल्हाधिकारी डॉ जयकुमार फड

सावंतवाडी प्रतिनिधि
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असते. दान करण्यासाठी दातृत्व असाव लागते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच दातृत्व हे समाज परिवर्तन घडविणारे असल्याने त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजीत करण्यात आलेले रक्तदान शिबीर हे समाजाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन सावंतवाडीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. जयकुमार फड यांनी येथे केले.
सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समिती व सिंधुरत्न मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने येथील समाज मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, समन्वय समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव बाबली गवंडे, ॲड. संदिप चांदेकर, अनिकेत सावंत, पत्रकार मोहन जाधव इ. उपस्थित होते.
प्रारंभी सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. तर कांता जाधव व मान्यवारांच्या हस्ते मान्यवारांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात जयंत जावडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी जयंत जावडेकर, लक्ष्मण निगुडकर, प्रकाश तेंडोलकर यांनी शुभेच्छा दिल्या तर सुनिल जाधव यांनी समन्वय समितीच्या उपक्रमाचा आढावा घेतला. शेवटी केशव जाधव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अभिषेक रोढे, प्राजक्ता रेडकर, परिचारिका बागेवाडी, सिद्धार्थ पराडकर यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी, व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी, रक्तदाते व मान्यवर उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना उपजिल्हाधिकारी डॉ. फड, व मुख्याधिकारी जावडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डॉ. फड, जयंत जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवारांनी रक्तदान करून या उपक्रमात सहभाग घेतला. त्या सर्व मान्यवारांचे समन्वय समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.





