कणकवलीत रंगणार बॅडमिंटन चे सामने

कणकवली बॅडमिंटन क्लब व के एन के स्मॅशर्स चे आयोजन

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कणकवली बॅडमिंटन क्लब व के एन के स्मॅशर्स कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 चे आयोजन 8 व 9 एप्रिल रोजी कणकवलीत कणकवली नगरपंचायत च्या नव्याने उद्घाटन केलेल्या भालचंद्र महाराज संस्थानाकडील स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये करण्यात आले आहे. व या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे पुरस्कृत चषक व 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक के एन के स्मॅशर्स पुरस्कृत चषक व 20 हजार रुपये अशी बक्षिसे या स्पर्धेसाठी असणार आहेत. या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन आनंद पोरे, मनीष कर्पे, सोम गांगण, अमोल बोभाटे, अभी दाभोलकर, सर्वेश राणे, विशाल हळदिवे, विनायक नाईक, आशु मसुरकर, ओमकार कडू, निखिल गवळी, आदींनी केले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 77579 02424 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर/कणकवली

error: Content is protected !!