कणकवली मध्ये संत जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात

संत जगनाडे महाराजांची आरती करत जयंती केली साजरी
कणकवली मध्ये संत जगनाडे महाराज यांची 401 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी संत जगनाडे महाराज यांची आरती करण्यात आली. याप्रसंगी कणकवली तेली समाज तालुकाध्यक्ष महेश उर्फ बाळा डिचोलकर, सचिव विशाल नेरकर, सहसचिव सिद्धेश प्रकाश वालावलकर, आशिष वालावलकर, उत्कर्ष डिचोलकर, दत्ताराम हळदणकर, नंदू आरोलकर, प्रकाश काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली, परशुराम झगडे, नितीन कुवळेकर आदी उपस्थित होते.





