महापुरुष छाया मंडळ नडगिवे यांच्या वतीने ६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

नडगीवे धुरीभाटले वाडी येथील श्री महापुरुष छाया मंडळ (रजि.) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री विलास करंगुटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे – सकाळी १० ते १२ – वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १ ते ३ वाजता – महाप्रसाद, सायं. ३ ते ५ – वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायं. ४.३० ते ५.३० – वाजता पुरुषासाठी मैदानी खेळांचा कार्यक्रम, सायं. ५.३० वाजता – महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन, सायं. ६ वाजता – स्थानिक भजने, सायं. ७ ते रात्री ९ वाजता – भव्य दिंडी सोहळा, रात्री ९ ते १० वाजता स्नेह भोजन कार्यक्रम तर रात्री ठीक १०.०० वाजता – सास्कृतिक कार्यक्रम म्हणून मालवणी नाटक – “बायको शिवाय काय खरा नाय” सादर होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री महापुरुष छाया मंडळ नडगीवे या मंडळाचे सचिव श्री. प्रवीण मोरये, खजिनदार रत्नराज आंबेरकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!