खारेपाटण हायस्कूल येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित व रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या सौजन्याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा 2025 दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी खारेपाटण हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे 100 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे मुख्य पंच श्री. श्रीकृष्ण आडेलकर यांनी काटेकोर निरीक्षणाखाली संपूर्ण स्पर्धा सुरळीत पार पाडली. सहाय्यक पंच म्हणून श्री. राजेंद्र तवटे, श्री. सुयोग धामापूरकर आणि श्री. प्रदीप देसाई यांनी प्रभावीपणे काम पाहिले.

खुल्या गटातील निकाल पुढीलप्रमाणे —
१) यथार्थ डांगी (प्रथम) सावंतवाडी
२) रुद्र मोबारकर (द्वितीय)वेगुर्ला
३) वरद तवटे (तृतीय)कणकवली
४) वैभव राऊळ, सावंतवाडी
५) चेतन भोगटे, कणकवली
६) अन्वय सापळे वेंगुर्ला
७) दुर्वांक मलबारी वेंगुर्ला
८) तनिष्का आडेलकर, कणकवली
९) सौरभ धारगळकर, वेगुर्ला
१०) पुष्कर केळुसकर सावंतवाडी

सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. तसेच U-9, U-11, U-14, U-17 आणि U-19 वयोगटांतील मुला-मुलींना मेडल व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेस खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, संचालक श्री. ए. डी. कांबळे, श्री. दिगंबर राऊत, रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या खजिनदार सौ. सारिका महिंद्रे, प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप,पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत उपस्थित होते. सहाय्यक शिक्षक श्री किरसिंग पाडवी, श्री संगप्पा गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण हायस्कूल यांनी उत्तम नियोजन केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.

error: Content is protected !!