खारेपाटण येथे पशू वैद्यकीय दवाखाना इमारतीचे भूमिपजन संपन्न..

खारेपाटण येथे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन तथा डी पी डी सी निधी योजनेतून मंजुरी मिळालेल्या पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी २ च्या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच सिंधुदुर्ग जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
खारेपाटण रामेश्वर नगर येथे बांधण्यात येणाऱ्या या पशू वैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात सुमारे ६० लाख रुपये निधी मंजूर झाला असून उर्वरित कामासाठी पुढील निधी मंजूर होणार आहे.तर पशु वैद्यकीय स्वतंत्र आर सी सी इमारत व कर्मचारी निवासस्थान यांसह कार्यालयाचा यामध्ये समावेश असणार आहे. खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने या करीता सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
या पशू वैद्यकीय दवाखाना भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,उपसरपंच श्री महेंद्र गुरव
माजी पं.स.सदस्या सौ तृप्ती माळवदे,माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,ग्रामपंचाय सदस्य श्री सुधाकर ढेकणे,जयदीप देसाई,सौ मनाली होणाळे,सौ दक्षता सुतार,खारेपाटण सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री संतोष पाटणकर,श्री राजेंद्र वरूणकर,खारेपाटण सोसायटीचे संचालक श्री विजय देसाई,मोहन पगारे,इस्माईल मुकादम,सौ उज्ज्वला चिके,तसेच श्री किशोर माळवदे,प्रणय गुरसाळे, श्री शमशुद्दीन काझी,वसीम मुकादम देवानंद ईसवलकर,शेखर शिंदे,शेखर कांबळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.





