मालडी येथे देवजी बुवा मठात ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव

मालवण तालुक्यातील मालडी येथील देवजी बुवा मठात दत्त जयंती उत्सव यावर्षी ४ डिसेंबर रोजी उत्साहात साजरा होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने पुराणोत्त पद्धतीने हा उत्सव आयोजित करण्यात आला असून पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी सजविलेल्या पालखीची सजावट सायंकाळी ५ वाजता सुरू होईल व ६ वाजता दत्त जन्मासाठी ती सज्ज करण्यात येईल.

कार्यक्रमाची सुरुवात सायं. ४.४५ वाजता ह. भ. पा. दाजीबुवा मालणकर यांच्या श्रीदत्तजन्मोत्सव कीर्तनाने होईल. त्यानंतर सायं. ६ वाजता शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होईल. पूजनानंतर दत्त मूर्तीचे पालखीत विराजमान करून महिलांकडून दत्त जन्माची पाळणा गीते गायली जातील. मंदिर परिसरात प्रदक्षिणा, गाभाऱ्यात आरत्या व ब्राह्मणांकडून गावकऱ्यांच्या वतीने गाऱ्हाणे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्रौ ८.३० वाजता महाप्रसादाचे वितरण सुरू होईल व ९.३० वाजता स्थानिक कलाकारांचे भजनाने उत्सवाची रंगत वाढणार आहे. उत्सवाच्या आयोजनात ग्रामस्थांनी घेतलेला सहभाग आणि प्रयत्न उल्लेखनीय असून कार्यक्रम यशस्वी होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मालडी ग्रामस्थानी केले आहे.

error: Content is protected !!