खारेपाटण संभाजीनगर येथे आढळला बिबट्या; वनविभागाने बिबट्याला सुखरूपपणे केले जेरबंद

ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

खारेपाटण संभाजीनगर स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला फासकीत बिबट्या अडकल्याची खबर आज खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव यांनी वनविभागाला दिली.उपवनसंरक्षक सावंतवाडी -मिलिश शर्मा ,सुनील लाड -सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल कणकवली -सुहास पाटील यांचे नेतृत्वात, पशुधन विकास अधिकारी सारिका दहिफळे यांचे देखरेखित खारेपाटण येथे जाऊन सदर बिबट्यास सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद केले. सदर रेस्क्यू धुळू कोळेकर वनपाल फोंडा ,श्रीकृष्ण परीट वनपाल देवगड, वनरक्षक सुखदेव गळवे , विजय भोसले प्रशांत कांबळे , शुभम पाटील, अंकुश माने , स्वाती व्हनवाडे रोहित सोनगेकर, रामदास घुगे, वाहन चालक सागर ठाकूर जलद कृती दल सदस्य रिध्देश तेली ,मयूर राणे आणि निलेश मोरये तसेच सरपंच खारेपाटण सौ.प्राची इस्वलकर तसेच उपस्थित ग्रामस्थ सागर खांडेकर यांनी सहकार्य केले त्याबद्दल वनविभागाने त्यांचे आभार मानले.ग्रामस्थांनी देखील वनविभागासाठी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!