न्यू इंग्लिश स्कूल, आचरामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा या प्रशालेच्या भव्य मैदानात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन धी आचरा पीपल्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप गोपाळ परब मिराशी सचिव सन्माननीय ॲड. सुभाष आचरेकर आणि शालेय समितीचे अध्यक्ष जे.एम.फर्नांडीस सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी प्रदीप परब मिराशी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व क्रीडाज्योत प्रज्वलित करून तसेच सचिव ॲड. सुभाष आचरेकर साहेब यांनी श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रशालेतील जिल्हा व विभागस्तरीय खेळाडूंनी क्रीडाज्योत घेऊन मैदानाला प्रदक्षिणा घातली.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत इयत्ता पाचवी व सहावी, इयत्ता सातवी व आठवी, इयत्ता नववी व दहावी व इयत्ता अकरावी व बारावी या चार गटातील विद्यार्थ्यांनी 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, रिले ,थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक,रस्सीखेच, बॉल बॅलन्सिंग, कोन बॅलन्सिंग, बॉल इन टू बकेट अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी शालेय समितीचे अध्यक्ष .जे. एम. फर्नांडिस सर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी शालेय स्कूल समितीचे सदस्य बाबाजी भिसळे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष फर्नांडिस सर, शालेय समितीचे सदस्य भिसळे सर ,मुख्याध्यापक श्री घुटुकडे सर,उपमुख्याध्यापिका सौ.माणगावकर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते 270 विजेत्या स्पर्धकांना गोल्ड मेडल व सिल्वर मेडल देऊन गौरविण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी अनुशासन, उत्साह व खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करत स्पर्धेला संस्मरणीय रूप दिले.





