एसपीएस फार्मसी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सहा विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर निवड
वाडी हुमरमळा येथील श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये झालेल्या ‘आविष्कार संशोधन स्पर्धे’त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील ६ विद्यार्थ्यांची विद्यापिठाच्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा ४ नोव्हेंबर रोजी ऑफलाईन पार पडली. स्पर्धेत एकुण १२ विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विविध विषयांवर पोस्टर सादरीकरण तसेच वर्किंग मॉडेल्स सादर केले. त्यात इंजिनिअर व टेक्नॉलॉजी विषयात कु. सायली राऊळ हिला पहिला तर कु. रुतीका पोळ हिला दुसरा रॅंक मिळाला. फ्युयर सायन्स विषयात कु. धनश्री प्रभू हिला पहिला रॅंक मिळाला. ॲग्रीकल्चर विषयात कु. चैताली दळवी हिला पहिला रॅंक मिळाला. मेडिसीन ॲन्ड फार्मसी या विषयात चैतन्य सरोडे याला पहिला रॅंक मिळाला तर कु. संचिता जावकर हिला दुसरा रॅंक मिळाला. ह्या ६ रॅंकर्सची निवड विद्यापिठाच्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे.
या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सौ. रुतुजा परब (कॅम्पस डायरेक्टर), संदेश सुळ (विभाग प्रमुख) व अमित शहापुरकर (शैक्षणिक प्रमुख) उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणू असिस्टंट प्रोफेसर प्रतीक तेर्से व महादेव परब यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मूल्यांकन केले. कार्यक्रमाचे समन्वयक असिस्टंट प्रोफेसर शंकर मुसळे व रुशीका कुबल (आविष्कार संस्थात्मक समन्वयक) होते. संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत व प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती, विश्लेषणात्मक विचारशक्ती आणि समस्यांचे निराकरण करण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी अत्यंत यशस्वी ठरला.





