कुडाळ न्यायालयाच्या वतीने कुडाळ हायस्कुलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

तालुका विधी समिती आणि वकील संघटनेचे संयुक्त आयोजन
कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने कुडाळ हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज येथे आज राष्टीय शिक्षण दिनानिमित्त कुडाळ दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी ए कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
११ नोव्हेंबर हा दिवस भारताचे प्रथम शिक्षण मंत्री अब्दूल कलाम आझाद यांच्या जयंत्ती निमित्त राष्टीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वकील श्रीमती रुपाली कदम यांनी भारताचे प्रथम शिक्षण मंत्री अब्दूल कलाम आझाद यांचेविषयी माहिती दिली. तसेच ड्रग्जचा गैरवापर याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच वकील समीर कुलकर्णी यांनी बालकांचे लैगीक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम याविषयी कायदेविषक माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिवाणी न्यायालयाचे वरीष्ठ लिपीकआर टी आरेकर यांनी केले. कुडाळ हायस्कूल ज्युनीअर कॉलेजचे प्राध्यापक सतीश तेरसे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला ८० ते ८५ विदयार्थी व शिक्षक उपस्थित होते.





