कणकवलीत रंगला भजन संध्या कार्यक्रम

संगीताच्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध

सुप्रसिद्ध भजन गायक कृष्णा देशमुख, अजित गोसावी संदीप देशमुख आणि सुप्रसिद्ध पखवाज वादक बंडुराज घाडगे यांच्या जुगलबंदी आणि सादरीकरणामुळे कणकवली येथे आयोजित केलेला भजन संध्या कार्यक्रम खूपच रंगतदार होत गेला.

भजन प्रेमी ग्रुप कणकवली यांच्या वतीने हा कार्यक्रम श्री भालचंद्र बाबा मठ येथेआयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संतोष कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री भालचंद्र बाबा संस्थानचे सचिव श्री केळुसकर, भजनी बुवा श्री प्रकाश पारकर, भजनी कलाकार संस्थेचे सचिव गोपीनाथ लाड, भूषण वाडेकर, भास्कर गावडे मारुती मेस्त्री, सुदर्शन फोपे ,सेवानिवृत्त अधिकारी रविकांत मेस्त्री, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, लक्ष्मीकांत भावे, अजित सावंत, मोहन पडवळ, सुधीर जोशी डॉक्टर सुहास पावस्कर, भजनी बुवा संदीप नाईकधुरे, बुवा सदानंद कसालकर, श्री. तळगावकर, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्री गवंडळकर बाबा वरदेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मयूर मेस्त्री आणि रोहन गावडे बुवा सागर राठोड यांनी या कार्यक्रमासाठी साथ दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार गणेश जेठे यांनी केले.
संतोष कानडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन कलेचे संवर्धन करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत त्याला जनतेने साथ द्यावी असे आवाहन केले. प्रकाश पारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन गोपीनाथ लाड यांनी केले. यावेळी भूषण वाडेकर यांनी आभार व्यक्त केले. सागर मेस्त्री अमोल बोंद्रे वैभव नानचे गणेश पारकर, पंढरीनाथ गुरव, विकास गुरव, अनिल मेस्त्री, नीलकंठ मेस्त्री, प्राध्यापक जगदीश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी रसिकांनी फार मोठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत हा कार्यक्रम रंगत गेला.

error: Content is protected !!