ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांची पत्रकार परिषद तडकाफडकी रद्द

काँग्रेसच्या भूमिकेमुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याची चर्चा
संदेश पारकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार संदेश पारकर यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. व त्यानंतर शहर विकास आघाडी किंवा महाविकास आघाडी या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असताना अचानक सायकाळी 4.30 वाजता आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याने आता ही पत्रकार परिषद रद्द करण्यामागे नेमकी कारणे काय? असा सवाल चर्चेत येऊ लागला आहे. दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी स्वतंत्र लढण्याबाबत भूमिका मांडल्याने ही पत्रकार परिषद रद्द झाली का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. पारकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये सर्व 17 जागेवरील उमेदवारांनी ताकतीने लढण्या बाबत निर्णय घेतलेला असताना काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत आता महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पाडल्याची चर्चा आहे. दरम्यान एका महत्त्वाच्या बैठकीसाठी संदेश पारकर हे बाहेर गेल्याने पत्रकार परिषद रद्द झाले असे त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.





