विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत नानल चे यश

राज्यस्तरावर निवड

कणकवली/मयूर ठाकूर

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या दहावीचा विद्यार्थी कु सुश्रुत मंदार नानल याने नेत्र दीपक यश संपादन केले आहे
आपल्या बुद्धीने, कौशल्यपूर्ण खेळी व डावपेच यामुळे सुश्रुत ने हे यश संपादन केले आहे, या यशामुळे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत निवड झाली आहे.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विध्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे,सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत, सल्लागार श्री. डी.पी. तानावडे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!