अर्थसाक्षरतेच्या दिशेने कनेडी प्रशालेचे पहिले पाऊल!

विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेचा जागर प्रवास सुरु.

कणकवली:मयूर ठाकूर कणकवली तालुक्यातील कनेडी प्रशालेत “अर्थसाक्षरतेच्या दिशेने पहिले पाऊल” हा उपक्रम संपन्न झाला.बदलत्या काळात आर्थिक साक्षरतेचे महत्व ओळखून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जागरूकता,नियोजनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वित्तीय नियोजन,बचत,गुंतवणूक,बँकिंग व्यवस्थापन तसेच अर्थसहाय्याच्या विविध योजना यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.सध्याच्या युगात नव्या पिढीसमोर उभ्या राहणाऱ्या आर्थिक आव्हानांचा सखोल विचार करून स्वतःच्या जीवनात आर्थिक शिस्त कशी आणावी यावर विशेष भर देण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे अध्यक्ष भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप डॉ.प्रसाद देवधर,कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा.श्री.सतीश सावंत यांनी विद्यार्थ्यांना “ज्ञानासोबत अर्थसाक्षरता हीच खरी जीवनसंपन्नतेची गुरुकिल्ली आहे.”असे मार्गदर्शन केले.बदलत्या आर्थिक संरचनेत स्वतःचे आणि कुटुंबाचे अर्थविश्व सक्षम बनवण्यासाठी युवकवर्गाने नियोजनबद्ध विचारसरणी स्वीकारावी, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रभावीपणे पार पाडण्यात आले असून,विद्यार्थ्यांनी अर्थसाक्षरतेविषयी दाखविलेल्या उत्साही सहभागामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात आर्थिक जागृतीचा नवा प्रकाश झळकला.यां कार्यक्रमाचे आयोजन कु.रुचिरा सावंत,कु.सानिका सावंत यांनी केले तर मार्गदर्शन हर्षिता जोशी,मनस्वी पेंढारी,मानिनी बाईत यांनी केले
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अध्यक्ष भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप डॉ.प्रसाद देवधर,कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.सतीश सावंत,उपाध्यक्ष पी.डी सावंत,चेअरमन आर.एच सावंत,शालेय समिती सदस्य चंद्रशेखर वाळके,तुषार सावंत,मुख्याध्यापक सुमंत दळवी सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!