कणकवली निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरू

कनकनगर, शिवशक्तीनगर मधील तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत
कणकवली शहरातील कणकनगर-शिवशक्तीनगर येथील तरुणांनी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , भाजपा शहर अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे , भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, महादेव उर्फ ऋतिक नलावडे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला.
यावेळी अनादी साईल , साहिल परब , प्रथमेश पांगम , ओंकार पांगम , विकास पांगम , सुयोग कदम , भार्गव रायकर , प्रथमेश शिंदे , योगेश बाईत , रोहित जाधव इत्यादी तरुणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे.





