मालडीत १५ व १६ नोव्हेंबरला हरिनामाचा जल्लोष!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने धन्य झालेल्या मालवण तालुक्यातील मालडी गावात १५ व १६ नोव्हेंबर रोजी भक्तिभावाने हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. गावाच्या सांस्कृतिक परंपरेचा हा अखंड सोहळा यंदाही उत्साहाच्या वातावरणात रंगणार आहे.
१५ नोव्हेंबर रोजी सकाळी देवीची पूजा, अभिषेक व अलंकाराने सप्ताहाचा शुभारंभ होईल. मंत्रोच्चारांच्या गजरात सुहासिनी देवीच्या ओटी ने प्रारंभिक विधी पार पडतील. रात्रीची दिंडी भाविकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
या सोहळ्यात २० ते २५ गावांतील भजन मंडळींचा सहभाग अपेक्षित असून, त्यांच्या भक्तिगीतांनी वातावरण हरिनाममय होणार आहे.
१६ नोव्हेंबर रोजी काकड आरती, उत्तर पूजा आणि महाप्रसाद वितरणाने सप्ताहाची सांगता होईल.
मुंबई आणि मालडीतील ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने सहभागी होऊन संत परंपरेचा गौरव आणि हरिनामाची अखंड परंपरा जपण्याचा संकल्प व्यक्त करतील.
सर्व भक्तांनी या हरिनाम सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालडी ग्रामस्थांनी केले आहे.**





