संदेश पारकर लवकरच भूमिका स्पष्ट करणार

निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक सुरू

कणकवली शहर विकास आघाडी की महाविकास आघाडी चित्र काही वेळेत स्पष्ट होणार

कणकवली शहरात नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा विरोधात महाविकास आघाडी की कणकवली शहर विकास आघाडी या भूमिकेबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी बंद दाराआड महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. त्या बैठकीत आज काही वेळातच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असून लवकरच जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. कणकवली शहर विकास आघाडी की महाविकास आघाडी याबाबतचा निर्णय काही वेळातच स्पष्ट होणार असल्याने कणकवलीसह अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागून राहिले आहे. जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, प्रसाद अंधारी, सुदीप कांबळे, राजू शेट्ये, उमेश वाळके, सौरभ पारकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!