साकेडी येथील चंद्रकांत सावंत यांचे निधन

साकेडी फौजदारवाडी येथील रहिवासी चंद्रकांत महादेव सावंत (वय 52) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना प्रकृती अस्वास्थ्य मुळे पडवे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्यांची निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. साकेडी फौजदारवाडी येथील नवनियुक्त अंगणवाडी सेविका चित्रा सावंत यांचे ते पती होत. त्यांच्यावर आज मंगळवारी साकेडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





