कणकवली शहरात मोकाट गुरांचा जनतेला त्रास

शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा ठिय्या

नगरपंचायत कडून कार्यवाही करण्याची केली जातेय मागणी

कणकवली शहरात मोकाट गुरांचा उपद्रव सध्या वाढला असून शहरात रस्त्यावर जागोजागी रस्त्यावरच मोकाट गुरे ठाण मांडून बसत असल्याने जनतेला व वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम राबवली गेली होती. त्यानंतर मात्र ही मोहीम बासनात गुंडाळून ठेवण्यात आली. कणकवली शहरात बाजारपेठेसह शहरातील अनेक रस्त्यांवर मोकाट गुरांचा उपद्रव सध्या शहरवासीयांना त्रासदायक ठरत आहे. मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे अनेकदा अपघात देखील होत आहेत. मोकाट गुरांच्या मालकांचा शोध घेत याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी कणकवली शहरातील जनतेतून होत आहे.

error: Content is protected !!