कणकवलीत आज भजन संध्या कार्यक्रम

उपस्थित राहण्याचे आवाहन

  कणकवलीतील भजनप्रेमी ग्रुपच्या वतीने भजन संध्या असा संगीतमय जुगलबंदीचा कार्यक्रम सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वा. प.पू. भालचंद्र महाराज मठ येथील व्यासपीठावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भजन रसिक आणि संगीत प्रेमींनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन भजन प्रेमी ग्रुप कणकवली यांनी केले आहे 

गेल्या वर्षी भजन प्रेमी ग्रुपने जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला होता. कोकणातील भजन कला टिकावी आणि वृद्धिंगत व्हावी यासाठी विविध उपक्रम भजन प्रेमी ग्रुप राबवतो. यावर्षी भजन संध्या हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रायगड भूषण मृदुंगाचार्य ह.भ.प. बंडाराज घाटगे, रायगड भूषण बुवा कृष्णा देशमुख, सिंधुदुर्गची शान बुवा अजित गोसावी अशा सर्व दिग्गज कलाकारांचे सुस्वर गायन व वादन असणारा हा कार्यक्रम सादर होणार आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यातील भजन रसिकांसाठी व कणकवलीकरांसाठी अद्वितीय संगीत नजराणा ठरणार आहे. तरी सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन भजनप्रेमी ग्रुप कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!