साळगाव येथील भजन स्पर्धेत झारापचे श्री भावई प्रासादिक भजन मंडळ प्रथम

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर साळगाव येथे हरिनाम सप्ताह निमित्त झालेल्या साळगाव पंचक्रोशी मर्यादित भजन स्पर्धेत श्री भावई प्रासादिक भजन मंडळ झाराप. (बुवा साहिल बोभाटे) यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
या भजन स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण अलीकडेच झाले. प्रथम क्रमांक – श्री भावई प्रासादिक भजन मंडळ झाराप (बुवा साहिल बोभाटे), द्वितीय क्रमांक-श्री जगन्नाथ प्रासादिक भजन मंडळ बोरदेवाडी केरवडे (बुवा शाम राजन चव्हाण), तृतीय क्रमांक – श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ तुळसुली (बुवा गुरुप्रसाद सुहास आजगावकर), उत्तेजनार्थ प्रथम – श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ तेरसे बांबर्डे (बुवा केदार सडेकर), उत्तेजनार्थ द्वितीय – श्री रामेश्वर माऊली चावडी महापुरुष भजन मंडळ घावनळे (बुवा स्वप्नील सावंत). तर वैयक्तीक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट गायक – साहिल बोभाटे (भावई प्रासादिक भजन मंडळ झाराप), उत्कृष्ट हार्मोनियम – प्रताप भोई (नवतरुण युवक भजन मंडळ नानेली). उत्कृष्ट तबला वादक – सिद्धेश वेंगुर्लेकर (कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ गावठणवाडी साळगाव). उत्कृष्ट पखवाज – प्रणव परब (जगन्नाथ प्रसादिक भजन मंडळ बोरदेवाडी), पखवाज प्रोत्साहनपर – किरण सावंत (कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ गावठणवाडी), उत्कृष्ट झांजवादक – कु. चिरायू भोई (नवतरुण प्रासादिक भजन मंडळ नानेली), उत्कृष्ट कोरस – श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ तुळसुली.





