माणसाने नेहमी शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असले पाहिजे – वीरसिंह वसावे

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बहिस्थ बी.एस्सी. शिक्षणक्रमाचा शुभारंभ
माणसाने नेहमी नवनवीन ज्ञान शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असले पाहिजे. मग ते इतरांच्या अनुभवातून असो किंवा स्वाभिमातून असो. वाचनातून असो किंवा शिक्षकांच्या शिकवण्यातून असो. आपण नेहमी शिकत राहिले पाहिजे. शिकण्यातून सतत ज्ञान मिळत असते. आपण ज्ञानाने अपडेट असले पाहिजे.”असे उद्गार कुडाळ तालुका तहसीलदार विरसिंग विसावे यांनी काढले. ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकशी संलग्न बॅ. नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाच्या केंद्रामध्ये मान्यता मिळालेल्या बहिस्थ बी.एस्सी. शिक्षणक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यापीठ गीताने व दीप प्रज्वलन करून आणि बी.एस्सी. शिक्षणक्रमाच्या नाम फलकाचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख अरुण मर्गज, केंद्र समन्वयक नितीन बांबर्डेकर, बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे , सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी व विद्यार्थ्यांना शिकविणारे प्राध्यापक इत्यादी उपस्थित होते.
तहसीलदार वीरसिंग वसावे म्हणाले, आपण शिकलो एवढ्यावर थांबू नका. तर अनेक गोष्टी शिकायच्या राहिल्या आहेत त्या शिकून घ्या. सतत भ्रमणध्वनीच्या संपर्कात राहण्यापेक्षा पुस्तकांच्या सानिध्यात रहा. एकटेपणा जाणवणार नाही. विविध ग्रंथांच्या बरोबर धर्मग्रंथांचेही वाचन करा. कारण कोणताही धर्मग्रंथ द्वेष पसरवत नाही किंवा मानवतेला विरोध करत नाही आणि हिंसा शिकवत नाहीत; पण काही संकुचित वृत्तीची माणसं धर्माधर्मांमध्ये द्वेष पसरवत आहेत. त्यापासून सावध राहू शकतो. शिक्षकांच्या शिकवण्याचे महत्त्व सांगताना वाचनापेक्षा शिक्षकानी शिकवलेले समजण्यास सोपे जाते. म्हणून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण शिक्षकांच्या शिकवण्या ऐकल्या पाहिजेत.असे श्री. वसावे म्हणाले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या मार्फत ही जी बहिस्थ बी. एस्सी पदवी प्राप्त करण्याची सुसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या संधीचा लाभ घ्या. शिकण्याचा आनंद घ्या. न थकता न थांबता बी. एस्सी. पूर्ण करा आणि आपलं स्वतःचं करिअर घडवा. असे आवाहन करत त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बी. एस्सी.च्या नव प्रवेशित विद्यार्थ्यांना संबोधित करताना संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी “बारावी सायन्स नंतर कुठल्यातरी सेवेमध्ये असलेल्यांना बी. एस्सी. पूर्ण करण्याची इच्छा असूनही सदर पदवी ही रेगुलर असल्यामुळे ती पदवी पूर्ण करून बी. एस्सी. होता येत नव्हतं ही गैरसोय लक्षात घेऊन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने बॅ. नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे हे जे सेंटर सुरू केले आहे त्या अंतर्गत बहिस्थ बी. एस्सी ची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या मार्फत आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करावे. असे आवाहन केले. वीरसिंह वसावे यांसारख्या एका उच्च विद्या विभूषित शिक्षण प्रेमी अधिकाऱ्यांच्या हस्ते ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त या शिक्षणक्रमाचे उद्घाटन होते आहे. ही सौभाग्याची बाब असल्याचे नमूद केले आणि प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
केंद्रप्रमुख अरुण मर्गज यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनी या सुसंधीचा योग्य वापर करावा. लाभ घ्यावा आणि बी. एस्सी पासून वंचित असलेल्या मित्रमंडळींना यासाठी प्रेरित करावे. असे आवाहन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व त्यांच्या एनरोलमेंटची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. व शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सुमन करंगळे सावंत यांनी मानले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्र समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले. यावेळी बी. एस्सी. शिक्षणक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी, त्यांना शिकवणारे प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.





