वैभववाडी ठाकरे सेनेच्या तालुकाप्रमुख पदी नंदू शिंदे यांची निवड झाल्याबद्दल तालुक्याने केला सत्कार

विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक केले अभिनंदन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुका प्रमुख पदी नंदू शिंदे यांची निवड करण्यात आली असून आज वैभववाडी तालुका शाखेत नवनिर्वाचित तालुका प्रमुख नंदू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी नंदू शिंदे यांची तालुका प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभववाडी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सतिश सावंत व सुशांत नाईक यांनी येणाऱ्या पंचायत समितीचे व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.
सतीश सावंत म्हणाले किरकोळ एखादा पदाधिकारी या तालुक्यातून गेला आहे. त्याचा काही परिणाम पक्षावर होणार नाही. नवनिर्वाचित तालुका प्रमुख नंदू शिंदे हे जुने शिवसैनिक आहेत त्यांना वैभववाडी तालुक्याची माहिती आहे. वैभववाडी तालुक्याचे प्रश्न त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते चांगल्या प्रकारचे काम या तालुक्यात करतील. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्हाला यश जरी मिळालं नसेल तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीला या तालुक्यामध्ये आम्हाला चांगला प्रकारे यश मिलेळ असा आत्मविश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सुशांत नाईक म्हणाले लोके हे माजी तालुका प्रमुख होते. त्यांना पक्षाने बडतर्फ करण्यात आले होते. मंगेश लोकेंचा प्रवेश हा फक्त खंबाळे गावापुरताच मर्यादित होता. त्यांच्या पक्ष सोडण्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आमची पक्ष संघटना आणखी मजबूत होईल. येणाऱ्या निवडणुकीत पंचायत समिती, जिल्हा परिषद वर भगवा फडकवण्याचा आमचा निर्धार आम्ही पूर्ण करू. नंदू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा वैभववाडी तालुक्याची फळी बांधण्यात येईल.
यावेळी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, माजी पं. सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, तालुका सचिव गुलझार काझी, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, कोळपे विभागप्रमुख जितेंद्र तळेकर, कोकिसरे विभागप्रमुख यशवंत गवाणकर, लोरे विभागप्रमुख सूर्यकांत परब, महिला तालुकाप्रमुख नलिनी पाटील, महिला तालुका संघटक दिव्या पाचकुडे, नगरसेवक बंधू सावंत, लोरे उपविभागप्रमुख स्वप्नील रावराणे, कोकिसरे उपविभागप्रमुख राजेश तावडे, नारायण दळवी, ॲड.अजितसिंह काळे, डॉ. आर. बी. जाधव, ओमकार इस्वलकर, करीम इसफ, वसंत खानविलकर, अमित कुडतरकर, जनार्दन विचारे, सुरेश पांचाळ, श्रीराम शिंदे, दीपक चव्हाण, आनंद नांदोस्कर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!