आडेलीच्या सोमेश्वर-सातेरी देवस्थान येथे ५ ऑक्टोबरला दसरा विशेष कार्यक्रम

दसरोत्सवानिमित्त श्री देव सोमेश्वर सातेरी व इतर परिवार देवता पंचायतन समिती-आडेली (ता वेगुर्ले)यांच्या सौजन्याने रविवार ५ ऑक्टोबर रोजी श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली येथे “दसरा विशेष कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विशेष निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कारसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ५ रोजी सायं. ७.०० वा. उद्घाटन समारंभ होईल. त्यानंतर सायं. ७.३० ते रात्रौ ९ नृत्याविष्कार व रेकॉर्ड डान्स, कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत आणि गावातील निवडक कलाकारांचे नृत्याविष्कार रेकॉर्ड डान्स रात्री ९ ते १० यावेळेत होतील. त्यांनतर रात्री १० वाजता ताराराणी फुगडी मंडळ, केळूस-कुडाळ यांचे फुगडी नृत्य होईल. महिलांसाठी खास आकर्षण खेळ पैठणीचा निवेदक शुभम धुरी घेणार आहेत.
या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ, युवा वर्ग, महिला वर्ग, मित्रमंडळी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानचे प्रमुख मानकरी, गावकर, ग्रामस्थ व देवस्थान कमिटी आडेली यांनी केले आहे.





