खारेपाटण हायस्कूलमध्ये पार पडलेल्या हापकीडो मार्शल आर्ट क्रीडा प्रकार स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरावर नेत्रदीपक यश

हापकिडो ही एक कोरियन मार्शल आर्ट असून ती लांब पल्ल्याच्या आणि जवळच्या लढाईच्या तंत्रांचा वापर या क्रीडा प्रकारात केला जातो. खारेपाटण हायस्कूल येथे पार पडलेले या स्पर्धेचे उद्घाटन खारेपाटण हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय सानप यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर हापकिडो बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य सचिव श्री. राज वागतकर, हापकिडो बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा समिती सचिव श्री. उमेश शिंदे, राष्ट्रीय पंच श्री. विजय तिथे, श्री. यश शेळके ,श्री. शिवशरण कुंभार, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत उपस्थित होते. विविध वजनी गटात व वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये खालील वयोगटातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
वजन गट 43 किलो मुले
१) वेदांत कोवळे २) उमेश सुर्वे ३) अथर्व देसाई
वजन गट 46 किलो मुले
१) अर्णव जामसंडेकर २) हर्ष तावडे ३) जय उन्हाळकर
वजन गट 49 किलो मुले
१) हर्ष गुरव २) सम्मेद उपाध्याय ३) अनिश तिल्होरकर
वजन गट 52 किलो मुले
१) तुषार पांचाळ २) निनाद तावडे
वजन गट 55 किलो मुले
१) अजीज मुजावर २) शुभम चव्हाण ३) राज हरयाण
वजन गट 58 किलो मुले
१) शिवराज पवार २) प्रतीक धुळप
वजन गट 61 किलो मुले
१) साहिल कदम २) सोहम पवार
वजन गट 64 किलो मुले
१) अजय हिप्परकर २) आयुष हरियाण
वजन गट 67 किलो मुले
१) अहमद पावसकर
वजन गट 33 किलो मुली
१) जागृती तावडे २) सानिया जाधव ३) सारंगी कानडे
वजन गट 36 किलो मुली
१) सृष्टी शेट्टी २) प्रियंका तावडे ३) समीक्षा जेधे
वजन गट 39 किलो मुली
१) त्रिवेणी परब २) पायल गुरव ३) श्रावणी निमगारे
वजन गट 42 किलो मुली
१) अनुष्का गाडी २) मयुरी सुतार ३) ऋतुजा गायकवाड
वजन गट 45 किलो मुली
१) अनुष्का धुवाळी २) दूर्वा राऊत ३) ईश्वरी पाटील
वजन गट 48 किलो मुली
१) रिया वाघरे २) अनुष्का पतियान ३) सृष्टी कोलते
वजन गट 51 किलो मुली
१) सानिका गावडे २) सारा शेंगाळे ३) नीलम अडुळकर
वजन गट 54 किलो मुली
१) तेजस्वी मिशाळ २) सारा कांबळे३) सांगवी कानडे
वजन गट किलो मुली
१) आर्या शिंदे २) रीदा शेमणे
वजन गट 60 किलो मुली
१) सानिया पवार २) मनाली साळवी
वजन गट 63 किलो मुली
१) किंजल इंगळे २) सानवी धुरी
वजन गट +63 किलो मुली
१) श्रावणी तावडे २)अपूर्वा जाधव
दक्षिण आशिया टेकयान महासंघाचे महासचिव एड. श्री. राज वागदकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे उपाध्यक्ष श्री.भाऊ राणे सचिव श्री. महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त, प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!