कणकवलीत भाजप तर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते आणि आरएसएस चे विचारवंत, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संयोजक संदीप सावंत, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, संदीप भोसले, शिशिर परूळेकर, भाई आंबेलकर, निसार शेख, रघुनाथ चव्हाण, अभय गावकर, सागर पवार, महेश गोसावी, बाळकृष्ण मेस्त्री उपस्थित होते.





