महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात घेतलं गणेश दर्शन

भाजपची पूर्ण फळी वावरत आहे विशाल परब यांच्यासोबत

विशाल परब यांच्या भाजप प्रवेशानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे उत्साह

महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गणेश दर्शनाच्या निमित्ताने घरोघरी भेटी दिल्या आहेत त्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद गणेश भक्ताकडून मिळत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघ निहाय विशाल परब हे दौरा करत आहेत. गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी दौरा सुरू केला आहे. त्यांच्यासोबत भाजपची पूर्ण फळी काम करताना दिसत आहे. 19 ऑगस्टला विशाल परब यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्या त्यानंतर त्यांनी पनवेल पासून सिंधुदुर्ग पर्यंत भव्य रॅली काढली होती. त्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने ते घरोघरी जाऊन गणेश दर्शन घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेत आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विशाल परब यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांना गेल्या काही दिवसात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत विशाल परब यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना तब्बल 35 हजार मतं मिळाली होती. या सर्व मतदारांचे आभार या निमित्ताने विशाल परब घरोघरी जाऊन मानताना दिसत आहेत. विशाल परब यांचा सावंतवाडी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असल्याचे त्यांच्या या गणेश दर्शनातून दिसून येत आहे. प्रत्येक गणेश भक्ताच्या भेटीनंतर मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया विशाल परब यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!