सावंतवाडीत पुन्हा “रामराज्य” आणायचे आहे

सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांनी समाजाला कायम आदर्श घालून दिला त्यांची पत्रकारिता सकारात्मक
हे वय घ्यायचे नाही, तर द्यायचे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ना.दीपक केसरकर
सावंतवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी रामराज्य असे संभवलेल्या सावंतवाडी शहराला पुन्हा एकदा रामराज्य आणायचे आहे, त्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे राज्याचा मंत्री असलो तरी आकाशात फिरणाऱ्या घारीप्रमाणे माझी नजर सावंतवाडी मतदारसंघावर आहे. त्याच्या विकासाचा ध्यास मी घेतला आहे त्या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करत आहे. पाठवलेल्या निधी आणि त्यातून होणारी विकास कामे यासाठी दर सोमवारी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बैठका घेऊन झाडाझडती घेणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी चे सुपुत्र नामदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना सांगितले. आपले वय आता घेण्याचे नव्हे तर देण्याचे आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण आणि रोप्य महोत्सवी पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते.
यावेळी गोव्याचे आमदार जीत आरोलकर, मुंबई मनपाचे माजी नगरसेवक शैलेश परब, दैनिक तरुण संपादक शेखर सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक,युवा नेते विशाल परब, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कोकणसाद संपादक सागर चव्हाण ,शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, देव्या सुर्याजी, शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख,समीरा खलील, सीमा मठकर, तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, जिल्हा खजिनदार संतोष सावंत, जिल्हा सदस्य हरिश्चंद्र पवार, अवधूत पोईपकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव,
मोहन जाधव, सचिन रेडकर, अभिमन्यू लोंढे, तालुका खजिनदार रामचंद्र कुडाळकर, तालुका सचिव प्रसन्न राणे,, तालुका उपाध्यक्ष काका भिसे,उत्तम नाईक, काका भिसे,मंगल कामत, उमेश सावंत, मयूर चराटकर, दीपक गावकर, जतीन भिसे, निलेश मोरजकर, हर्षवर्धन धारणकर, रमेश बोंद्रे, अनिल भिसे, विनायक गावस, सिद्धेश सावंत, अनुजा कुडतरकर, योगिता बेळगावकर, नरेंद्र देशपांडे, शुभम धुरी, साबाजी परब आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
. दरम्यान माझं हे वय घ्यायचं नाही तर द्यायचं आहे. महाराष्ट्रात शोधून सुद्धा सापडणार नाही, असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मी विकास करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सावंतवाडी पत्रकार संघाच्या माध्यमातून आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५०० विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत शिक्षण देणारी शाळा उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आर्थिक चणचण सोसावी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग सारखा जिल्हा महाराष्ट्रात नाही. पर्यटनासह इतर सर्वच दृष्टीने विकसित असा आपला जिल्हा आहे. त्याचे वैभव आणखीन वाढविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जातील. आता यापुढे मी टीका करणाऱ्यांकडे लक्ष देणार नाही. बोलणाऱ्यांना बोलायला दिलं पाहिजे. आणि आपण फक्त काम करत राहिलं पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान आपल्या राजकीय यशात पत्रकारांचा मोठा वाटा आहे. बऱ्याच वेळा त्यांचे मार्गदर्शन सुद्धा मला फायद्याचे ठरले आहे. त्यामुळे त्यांच्या न्याय हक्काचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमीच कार्यतत्व राहीन, असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी गोव्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा आदर्शवंत जिल्हा आहे हा जिल्हा निसर्गासंबंधी संपन्न असा जिल्हा आहे असे मत यावेळी व्यक्त केले. येथील पत्रकारिता आदर्शवत आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना आरोग्यसेवा गोवा राज्यात चांगल्या प्रकारे मिळणार असून त्या दृष्टीने आता गोवा सरकार पण सकारात्मक आहे.
यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा श्री. केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक गावस यांना प्रदान करण्यात आला. तर माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार अभिमन्यू लोंढे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच चंदू वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार लुमा जाधव यांना देण्यात आला. तर जीवनगौरव पुरस्कार देऊन रमेश बोंद्रे यांना सन्मानित करण्यात आले. परशुराम मांजरेकर यांना स्व. त्रि.अ. उर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर गणेश हरमलकर यांचा ज्येष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी २५ वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात गजानन नाईक, रमेश बोंद्रे, वसंत उर्फ अण्णा केसरकर, मोहन जाधव, अवधूत पोईपकर, अनिल भिसे, सुरेश गवस, महादेव परांजपे, राजेश मोंडकर, हरिश्चंद्र पवार, प्रवीण मांजरेकर, विजय देसाई, राजू तावडे, संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, हर्षवर्धन धारणकर, उत्तम नाईक, बबन उर्फ लक्ष्मण गवस, उमेश सावंत, आशुतोष भांगले, विजय राऊत ,मंगल कामत ,विष्णू चव्हाण आदींना गौरविण्यात आले.
येथील पत्रकारांनी समाजाला कायम आदर्श घालून दिला आहे. त्यांची पत्रकारिता सकारात्मक आहे. त्यामुळे आम्हाला काम करताना निश्चितच प्रेरणा मिळते, असे मत भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले. चांगल्याला चांगले म्हणणे ही केसरकारांची सवय मला आवडते. भविष्यात त्यांनी कुडाळात मध्यवर्ती ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मुंबई मनपा मध्ये मुलांच्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याच सोयी नव्याने राज्य शासन शिक्षणामध्ये आणत असल्याचे मनपा माजी नगरसेवक आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख शैलेश परब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले प्रथमच पत्रकारांच्या कार्यक्रमास येण्याचे भाग्य मला मिळाले येथील पत्रकार िता अत्यंत चोखंदळ आणि प्रामाणिक आहे गेले पंधरा वर्षे या विधानसभा मतदारसंघात काम करत असताना सकारात्मक पत्रकारिता दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण मांजरेकर तर सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार राजेश मोंडकर, व शुभम धुरी,व आभाप्रदर्शनतालुका खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले.
प्रतिनिधि / कोकण नाऊ / सावंतवाडी