पालकमंत्र्यांच्या वाढदिनी फोंडाघाट भाजप वतीने आयोजित केलेले उपक्रम स्तुत्य

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे गौरव उद्गार
फोंडाघाट येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय, हवेलीनगर येथे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या शिबिरात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत विविध आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशावेळी जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या वाढदिनी फोंडाघाट सारख्या ग्रामीण भागात महाआरोग्य शिबिराचे आगळे वेगळे आयोजन करून फोंडा भाजपाने एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी किसान मोर्चा राज्य सरचिटणीस राजन चीके, कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे,तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, फोंडा उपसरपंच तन्वी मोदी, उद्योगपती सुरेश सामंत, महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष हर्षदा वाळके, मंडल उपाध्यक्ष पंढरी वायंगणकर,बबन हळदिवे, सुजाता हळदिवे, हेमंत फोंडेकर, अनंत निकम, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,अजित नाडकर्णी, सुनील लाड, विश्वनाथ जाधव, नरेश गुरव, मिलिंद लाड, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, राजू पटेल, राजू रावराणे, ग्रामपंचायत सदस्य पांचाळ शिंदे, आत्माराम येरम, निलेश लाड ,अमित चव्हाण, रुपेश चव्हाण,जयेश लाड, दर्शना पेडणेकर, सिद्धेश पावसकर, नितीन पालकर, अनिकेत पारकर, आत्माराम नानचे विजय रेवडेकर तसेच वालावलकर रुग्णालय डेरवणचे डॉक्टर प्रवीण पेडणेकर आणि हॉस्पिटल सोशल वर्कर अमित वैद्य व त्यांचे सहकारी तसेच फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे सहकारी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमा चे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजन चिके यांनी केले. या आरोग्य शिबिराचा पंचक्रोशीतील असंख्य रुग्णांनी लाभ घेतला.