कणकवली शहरातील हायवेच्या स्ट्रीट लाईट अनेक ठिकाणी बंद

महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने तात्काळ लाईट सुरु करण्याची मागणी

पावसाळ्याच्या कालावधीत शहरात काळोखाचे साम्राज्य

कणकवली शहरातील महामार्गा वरील ठेकेदार कंपनीने बसवलेल्या स्ट्रीट लाईट सध्या बंद स्थितीत असून पावसाळ्याच्या पूर्वी याची दुरुस्ती करण्याची गरज होती. मात्र महामार्ग प्राधिकरण व महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉन यांच्याकडून या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत अनेकदा राजकीय पदाधिकाऱ्यांकडून देखील मागणी करून या कामाकडे दुर्लक्ष केला जात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात महामार्गावर कणकवली शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाळा जोर धरण्यापूर्वी शहरातील हायवे अंतर्गत येणाऱ्या स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

error: Content is protected !!