कोळोशी खून प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता

संशयित आरोपी तर्फे ॲड. विलास परब, ॲड. तुषार परब यांचा युक्तिवाद
कोळोशी येथील रहिवाशी मुंबई दलातून सेवानिवृत्त झालेले विनोद मधुकर आचरेकर वय 55 यांचे गावी घर असून ते गावी येऊन जाऊन असत. त्यांना तेथीलच त्यांचे नातेवाईक श्री पेडणेकर कुटुंबातील सिद्धिविनायक संजय पेडणेकर वय 23 हा घरचा जेवणाचा डबा देत असे. दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री सिद्धिविनायक हा आचरेकर याना डबा घेऊन गेला असता आचरेकर यांनी सिद्धिविनायक यास लैंगिक संबंध ठेवण्यासाठी लगट करू लागल्याने आरोपीने घरातीलच कुदळ घेऊन आचरेकर यांच्या डोक्यात मागील बाजूस मारून जखमी करून जीवे ठार मारले व दुसरे दिवशी आरोपीने 101 नंबर वर फोन करून स्वतः पोलिसाना कळविले. वरील फिर्याद कणकवली पोलीस ठाणे येथे दाखल असून आरोपीस दुसरे दिवशी अटक करण्यात येऊन आरोपी न्यायालयीन कोठडीत होता. पोलिसानी तपास काम पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान आरोपीस मानसोपचारतज्ज्ञाकडे देखील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. आरोपीची जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 यांनी रु पन्नास हजार रकमेच्या जात मुचलक्यावर व अटीशर्थीवर जामिनावर मुक्तता केली.
संशयित आरोपी तर्फे ॲड. विलास परब आणि ॲड. तुषार परब यांनी काम पाहिले.