ज्ञानकुंभ ज्ञानेश्वरी’ ला आचरा येथे उस्फुर्त प्रतिसाद

ज्ञानकुंभ ज्ञानेश्वरी’ ने ध्यान, अध्यात्म आणि मानसिक जागृती चा साधला त्रिवेणी संगम
संस्कृतीने नटलेल्या आचरा गावी ज्ञानकुंभ ज्ञानेश्वरी’ हा कार्यक्रम संपन्न झाला. आधुनिक जीवनातील तणाव, अस्थिरता आणि दिशाहीनता यावर समाधान शोधणाऱ्या प्रत्येक मनासाठी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या माध्यमातून आयुष्याची दुसरी संधी, बदल स्वीकारणं, मानसिकता, आत्मजाणीव, धीर, शिक्षणाचं खरं स्वरूप, भक्तीचं शुद्ध रूप यासारख्या विषयांवर अत्यंत हृदयस्पर्शी माहितीचे सादरीकरण प्रतिज्ञा रूमडे यांनी ‘ज्ञानकुंभ ज्ञानेश्वरी’ या कार्यक्रमा दरम्यान केले. हा कर्यक्रम निलेश सरजोशी यांच्या मांगल्य मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या मध्यंतरात घेतलेलं सामूहिक ध्यान हे स्वतःला समजून घेण्यासाठी आणि माऊलींच्या कृपेला आत्मसात करणारे ठरले. यावेळी संपूर्ण सभागृहात काही मिनिटे मंत्रमुग्ध शांतता पसरली होती. हे क्षण उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहतील तसेच प्रत्येक विचारात संगीताची गोड साथ घालतील असे होते. ज्ञानकुंभ ज्ञानेश्वरी हा कार्यक्रम ध्यान, अध्यात्म आणि मानसिक जागृती यांचा त्रिवेणी संगम ठरला.
या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, महिला, युवक, विविध व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि वयोवृद्धांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमासाठी प्रफुल्ल भाबल, अजय कोयंडे, मंदार सरजोशी, स्वाती कुबल सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमाचे संगीत, वादक श्री श्याम तोंडलकर आणि टीम यांचे लाभले.