फोर इडियट्स यांचे मायनिंग मध्ये लागेबंधे? माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्टेटस बनलाय चर्चेचा विषय

आज शिवसेना ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेवर माजी नगराध्यक्ष नलावडे यांचा निशाणा

कणकवलीत आज शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या फळीतील सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रित कासार्डे मायनिग या विषयावर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये कासार्डे मायनिंग चा आका कोण? असा सवाल करत या मायनिंग मधून अडीच कोटींचा हप्ता उकळला जातो असाही आरोप करण्यात आला. मात्र हा आरोप होऊन काही तास उलटतात तोच कणकवलीच्या माजी नगराध्यक्षांनी या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने एक सूचक व्हाट्सअप स्टेटस ठेवत विरोधकांवर जोरदार टीका केली. त्या व्हाट्सअप स्टेटस मध्ये नलावडे यांनी म्हटले आहे, “फोर इडियट्स ना उपरती, सत्तेत असताना अवैध मायनिंग का दिसले नाही? म्हणजे फोर इडियट्स यांचे मायनिंग मध्ये लागेबंधे होते. जनता खुळी नाही” अशा आशयाचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर ही टीका असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान याबाबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता पालकमंत्री नितेश राणे हे पालकमंत्री होऊन काही महिने झाले. मात्र “फोर इडियट्स” मधील अनेक जण सत्तेत होते हे सत्तेत असताना हे मायनिंग सुरू होते. त्यावेळी हे सर्वजण गप्प का बसलेले? निव्वळ पालकमंत्री नितेश राणे यांना आरोप करून बदनाम करण्यासाठी हा सर्व प्रकार आहे. मात्र फोर इडियट्स यांचा हा बनाव जनता ओळखून पुरी आहे त्यामुळे जनतेने या सर्वांना नाकारले आहे असा टोला त्यांनी लगावला.

error: Content is protected !!