वायंगणी धामणेवाडी येथे 10मे रोजी त्रैवार्षिक गोंधळ

मालवण तालुक्यातील वायंगणी धामणे वाडी येथील ब्राह्मण देव भवानी माता मंदिर येथे 9मे रोजी सत्यनारायण महापूजा तर 10 मे रोजी भवानी देवीचा गोंधळ होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.तरी या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन साळकर कुटुंबियांनी केले आहे
धामणे वाडीतील गावकरी आणि
मुंबईकर साळकर बंधु एकत्रित मिळुन आपला त्रैवार्षिक गोंधळ उत्साहाने साजरा करतात. सर्व भाऊबंद एकदिलाने एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी होतात. वाडीमधील विकासकामांनाहि हातभार लावत आहेत, त्याचप्रमाणे गावामधील गरजुंना आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देखील करत
आहेत.